ठळक बातम्या :

लोगो डिझाइन स्पर्धा, अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा..

आभाळमाया विषयी

दोन निर्मल शब्द 'आभाळ' आणि 'माया', म्हणजेच आकाश आणि काळजी, एकत्र येऊन बनतात 'आभाळमाया'. आमचे आणि निसर्गाचे नाते हि असेच आहे. आभाळा एवढे प्रेम आहे आमचे निसर्गावर आणि त्याची काळजी घेणे हि आपलेच कर्तव्य आहे.

आभाळमायाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौगुले हे महाराष्ट्रतील प्रसिद्ध वास्तुविशारद आहेत. पंचवीस वर्षे काम केल्यानंतर त्यांना अशी जाणीव झाली कि आपण पर्यावरणसाठी काही तरी केले पाहिजे. तिथूनच झाला आभाळमाया फौंडेशनचा जन्म. २०११ मध्ये सुरु केलेली हि संस्था आज सगळीकडे कार्यरत आहे.

आभाळमाया नावाचे मराठी मासिकदार तीन महिन्याने प्रकाशित होते. ह्या मासिकद्वारे आम्ही लोकांना आवाहान करतो कि आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.

त्याच बरोबर आभाळमाया फौंडेशनतर्फे सतत झाडे लावण्याचे उपक्रम घेतले जातात. रक्तदान, साहित्यसंमेलन, गरजू मुलांना शिष्यवृत्ती, ई. कार्यक्रम होत राहतात.

संस्थापक संदेश

माणूस म्हणून आपणच जबाबदार आहोत आईपृथ्वीच्या विकासासाठी व विनाशासाठी. आपल्याला सगळे काही विना मोबदला मिळते ह्या पृथ्वीकढुन आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतो. विध्वंस करण्याचा कोणताही अधिकार नाहीये आपल्याकडे, तरीही नाही सुधरत आपण.

माझी दृष्टी आहे कि आपण सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेतली पाहिजे आईपृथ्वीची. म्हणूनच संकल्पना सुचली 'आभाळमायाफौंडेशन' ची.

अनेक उपक्रमांमधून, निसर्ग व पर्यावरणाला सांभाळून, एक सशक्त पृथ्वी करण्याची माझी इच्छा आहे. हे सर्वकाही आपल्या येणाऱ्या पिढीसाठी होय.